ShareThis

Monday, May 2, 2011

Garja Maharashtra Maza...!

प्रिय स्नेही, आज महाराष्ट्राचा ५१ वा वर्धापन दिन...

त्यानिमित्ताने आजच्या दैनंदिन पत्रात फक्त मराठीचाच वापर करून मी 'मराठी वाचवा' च्या नावाने 'शंख' न करता 'आरंभ' करणार आहे. या माझ्या उपक्रमाला नैतिक बळ यावं म्हणून आणि प्रयोजनाचे औचित्य साधून मी इथे दोन गोष्टी सादर करणार आहे...

१. माझे अत्यंत आवडते श्रद्धास्थान कविवर्य सुरेश भट यांच्या व्यापक दूरदृष्टीतून उमटलेले हे अजरामर काव्य जे आजही तितकेच, किंबहुना अधिकच, खरे आहे...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी



पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी

आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

२. माहितीजालावर देखील मराठी किती समृद्ध आहे याची प्रचीती आणि अनुभूती देणाऱ्या मराठी मजकूर असलेल्या श्रुंखलांची सूची...

http://www.marathiworld.com/

http://www.marathisuchi.com/

http://www.onlinekavita.com/

http://www.onesmartclick.com/marathi/marathi.html

http://marathikaveta.blogspot.com/

http://www.chaprak.com/marathi-sampadakiya-editorial

http://marathiblogs.net/taxonomy/term/8275

http://marathikavitasangrah.com/

http://nilyamhane.blogspot.com/

http://dhinchak.darade.com/

http://dhondopant.blogspot.com/


उपर्निर्दिष्ट श्रुंखलांना किमान एकदा अवश्य भेट द्या...

आणि महाराष्ट्राचे वैभव पाहण्यासाठी खालील साखळी वापरा...

http://www.maharashtratourism.net/festivals/maharashtra-day.html

आपला दिवस सुखाचा जाओ आणि आपणास प्रतिक्षणं सतर्क वा जागृत असण्याची प्रज्ञा लाभो...!

No comments:

Post a Comment